Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "कृष्णविवर(भाग२)"

Read share best Marathi katha free "कृष्णविवर(भाग२)"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी

लेखक - केदार शिवराम देवधर ( पेण - रायगड )


कृष्णविवर - भाग २


भाग २ 


इकडे आशिषचे प्रयोगशाळेत जोरात काम चालू असते. रॉकेट च्या साह्याने माणूस अंतराळात प्रवास करू शकतो, तसेच जवळच्या काही ग्रहांपर्यंत पोहोचु शकतो. परंतु हे खूप खर्चिक काम आहे, तसेच त्याला देखील काही मर्यादा आहेत, हे असे आशिषच्या लक्षात आले होते. त्यामुळे मनुष्य देहाला कॉम्प्रेस करून एका सूक्ष्म गॅस ऍटम मध्ये कसे परिवर्तित करता येईल याबाबत त्याचे संशोधन चालू होते. वजनाने हलके झाल्यामुळे आपोआपच आपल्याला तरंगता येऊ शकते असा त्याचा विचार होता. त्यादृष्टीने त्याचे प्रयोग देखील जोरात चालू होते. खूप खर्चिक अशी मशिनरी देखील त्याने प्रयोगशाळेत तयार केली होती.

SUN IN THE SKY


इकडे डॉक्टर वामनांनी ठरल्याप्रमाणे बर्थडे पार्टी आयोजित केली. आशिषचे आई वडील आणि आशिष या सर्वांना आमंत्रण दिले. आशिषच्या आई-वडिलांना मात्र या प्रयोजनाची कल्पना दिली. परंतु दोघांच्या हातावरील चिन्हाबाबत मात्र काही सांगितले नाही. तसेच डॉक्टरांच्या मिसेसने विशाखाच्या आई-वडिलांना आणि विशाखाला आमंत्रण दिले. त्यांना मात्र काहीही सांगितले नाही. कारण मुळातच आशिष लग्नाला तयार नव्हता.


खरं म्हणजे आशिष कामात व्यस्त असल्यामुळे तिकडे जाण्यास उत्सुक नव्हता. परंतु त्याच्या आई-वडीलांनी पाठीस लागून त्याला तयार केले. वामन काकांचे शहर एक तासाच्या अंतरावर होते. आशिषच्या वडिलांनी संध्याकाळी गाडी काढली. तिघे जण वामन काकांच्या बंगल्यावर सहा वाजेपर्यंत पोहोचले. बंगल्या समोरील लॉनवर बर्थडे पार्टीची व्यवस्था केलेली होती. डॉक्टर वामन आणि त्यांची मिसेस या तिघांचेही स्वागत करतात. 


आशिषचे वडील (हळूच) - अरे वामन, विशाखा कुठे आहे?


डॉ. वामन - थांब जरा, हिने बोलावणे केलेले आहे. ती आणि तिचे आई-वडील इतक्यात येतीलच.


थोड्याच वेळात बाकीची माणसेदेखील जमू लागतात. विशाखा आणि तिचे आई-वडील देखील येतात. विशाखाचे आई-वडील बाकीच्या ओळखीच्या लोकांशी गप्पा गोष्टी करू लागतात. परंतु विशाखाच्या वयाचे कुणी तिथे नसल्यामुळे ती मात्र एका बाजूला बसून राहते. 


डॉक्टर काकांना देण्यासाठी विशाखाने गिफ्ट आणलेले असते. परंतु रॅपरवर नाव लिहिण्याचे राहून गेलेले असते. पेनाने नाव लिहिण्यासाठी ती पर्समध्ये हात घालते. ती पेन घरीच विसरलेली असते. अरे बापरे, आता कोणाकडे तरी पेन मागावे लागेल, ती मनातल्या मनात बोलते. तेवढ्यात तिची नजर थोड्या अंतरावर बसलेल्या आशिषकडे जाते. त्याच्या शर्टाच्या खिशाला पेन लावलेले असते. विशाखा त्याच्याजवळ जाऊन पेन देण्याची रिक्वेस्ट करते. आशिष विशाखाला पेन देतो. विशाखा गिफ्टच्या रॅपरवर नाव लिहून आशिषला पेन परत देते. त्याच बरोबर थँक यु असे म्हणते. दोघांची एकमेकांशी ओळख होते. आपण जे काही शोधत आहोत त्यातील थोडसं तरी मिळाले आहे असे आशिषला वाटु लागते. आशिषला विशाखा आवडते. विशाखादेखील पहिल्या भेटीतच आशिषच्या प्रेमात पडते. 


विशाखा आणि आशिषच्या गप्पा सुरू होतात.

आशिष - तु काय करतेस?


विशाखा - मी याच शहरातील एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून आहे. सहा महिनेच झाले आहेत मला नोकरीला लागून.


आशिष - तुझा सब्जेक्ट कोणता आहे?


विशाखा - मी फिजिक्स शिकवते. क्वांटम फिजिक्स मध्ये मी पीएचडी केलेली आहे.


आशिष - अरे वा, छानच.


विशाखा - तू काय करतोस?


आशिष - मी बाजूच्याच शहरात राहतो. मी देखील कॉलेजवर प्रोफेसर आहे. योगायोग म्हणजे माझा देखील फिजिक्सच विषय आहे. मी बायो फिजिक्समध्ये पीएचडी केलेली आहे. 


दोघांच्या गप्पा सुरू राहतात. विशाखाचे आई-वडील आल्याचे वामन काकांना आणि काकूंना कळते. ते लगेचच त्यांची भेट घेतात. 

डॉक्टरांची मिसेस - हे काय विशाखा कुठे आहे?


विशाखाची आई - ती आलेली आहे. बाहेरच कुठेतरी बसलेली आहे.


डॉक्टरांची मिसेस - चला मग, ती कुठे आहे ते बघू.


डॉक्टरांची मिसेस आणि विशाखाचे आई वडील विशाखाला शोधू लागतात. आशिष आणि आशिषच्या आई-वडिलांना देखील आमच्या मागोमाग घेऊन या, असे डॉक्टरांची मिसेस डॉक्टरांना हळूच सांगते.


डॉक्टर वामन आशिषच्या आई-वडिलांकडे जातात. विशाखा आणि तिचे आईवडील आल्याचे सांगतात. 


डॉ. वामन - अरे आशिष कुठे आहे?


आशिषचे वडील - बाहेरच लॉनवर बसलेला आहे.


डॉ. वामन - मग चला माझ्याबरोबर, मी तुमची आणि विशाखाच्या फॅमिलीची ओळख करून देतो.


सर्वजण लॉन मध्ये विशाखा आणि आशिष जेथे बसलेले असतात तेथे येतात. त्या दोघांना गप्पा मारताना बघून डॉक्टर वामन, आशिष च्या वडिलांना हळूच सांगतात की, मी ओळख करून देण्याच्या आधीच या दोघांची ओळख झालेली दिसते. डॉक्टर वामन, आशिषच्या फॅमिलीची आणि विशाखाच्या फॅमिलीची एकमेकांशी ओळख करून देतात. सर्वजण एकमेकांशी गप्पा मारतात. एकदा आमच्या घरी या असे आशिषची आई सगळ्यांना सांगते. आशिष आणि विशाखा एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवतात. 


थोड्या वेळाने डॉक्टरांची मिसेस डॉक्टरांचे औक्षण करते. त्यानंतर केक कापला जातो. गिफ्ट वगैरे देऊन झाल्यावर बुफे डिनर असते. आशिष आणि विशाखा परत एकत्र बसून खाऊ लागतात. जणूकाही ते दोघं एकमेकांना आधीपासून ओळखत आहेत अशा त्यांच्या गप्पा रंगतात. 


डिनर नंतर, डॉक्टरांचा निरोप घेऊन सर्व जण आपापल्या घरी निघून जातात. जाण्यापुर्वी आशिष चे आई वडील डॉक्टर काकांना भेटतात. विशाखा पसंत असल्याचे सांगतात. आता आशिष काय बोलतो ते बघू असे देखील सांगतात.



विशाखा आणि आशिषचे अधून मधून सोशल मिडियावर चॅटिंग चालू असते. त्यांची चांगली मैत्री जमते. आशिषचे प्रयोग देखील चालू असतात. मनुष्य देहाला कॉम्प्रेस करण्यात त्याला यश येते. तो स्वतःला कॉम्प्रेस करून सूक्ष्म अशा गॅसच्या अणूमध्ये परिवर्तित करतो. अशाप्रकारे तो हवेत तरंगू लागतो. तरंगताना तो वर जाऊ लागतो. आपला प्रयोग यशस्वी झाला हे बघून त्याला अत्यानंद होतो. परंतु तो पृथ्वीच्या कक्षेला भेदून जाऊ शकत नाही. वेगाने तो खाली फेकला जातो. सूक्ष्म रूपात असल्यामुळे त्याला इजा मात्र होत नाही.


आलेल्या अपयशामुळे आशिषला खूप दुःख होते. थोड्याच दिवसांनी बाजूच्या शहरात जाण्याचा योग येतो. कॉलेजच्या कामासाठी आशिषला विशाखाच्या कॉलेजमध्ये जावे लागते. काम पूर्ण झाल्यावर आशिष विशाखाला आणि डॉक्टर काकांच्या मिसेसला जाऊन स्टाफ रूम मध्ये भेटतो. विशाखा त्याला घरी येण्याचा आग्रह करते. तिच्याकडून आलास कि मग आमच्याकडे ये, असे डॉक्टरांची मिसेस आशिषला सांगते. 


कॉलेज सुटायची वेळ झालेली असते. कॉलेज सुटल्यावर आशिष विशाखाच्या बरोबर तिच्या घरी जातो. विशाखाचे आईवडील त्याला जेवणाचा आग्रह करतात. त्यांचा आग्रह न मोडता आल्यामुळे तो तेथेच जेवतो. विशाखाने देखील एक छोटीशी प्रयोगशाळा त्यांच्याच बंगल्यामध्ये सुरू केलेली असते. प्रयोगशाळा दाखविण्यासाठी विशाखा, आशिष ला घेऊन तिकडे जाते.


आशिष तिची प्रयोगशाळा बघतो. प्रयोगशाळा चांगली सुसज्ज असते. विशाखाच्या असे लक्षात येते की आशिषच्या मनात कोणते तरी दुःख आहे. ती त्याला त्याबाबत विचारते.


आशिष - तू माझ्याच क्षेत्रातली असल्यामुळे, तसेच माझी जवळची मैत्रीण असल्यामुळे, मी तुला एक गोष्ट सांगतो. अन्यथा बाकीच्या लोकांना हे खोटे वाटेल. माझे गेले काही महिने प्रयोग चालू होते. मला अंतराळ प्रवास करावा असे खूप वाटत आहे. परंतु सध्याच्या प्रचलित साधनांनी ते अशक्य आणि खूप खर्चिक आहे. त्यासाठी मी मनुष्य देहाला कॉम्प्रेस करून त्याचे गॅस ऍटम मध्ये रूपांतर करण्यात यश मिळविले आहे. 


विशाखा - अरे वा, हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. मग पुढे काय झाले?


आशिष - मला वाटले होते, हलक्या स्वरूपातील गॅस ॲटम हवेत तरंगत अंतराळात पोहोचू शकेल. पृथ्वीच्या वातावरण कक्षेपर्यंत माझा प्रयोग यशस्वी झाला. मी हवेत तरंगू देखिल लागलो होतो. परंतु पृथ्वीची वातावरण कक्षा भेदून मला जाता आले नाही. मी खाली कोसळलो.


विशाखा - तुझा प्रयोग खूपच महत्त्वाचा आहे. परंतु अंतराळ प्रवास करावा असे तुला का वाटत आहे? 


आशिष - गेले काही वर्षे माझे मन काहीतरी शोधत आहे. आपलं कोणीतरी दूर असल्यासारखं वाटत आहे. परंतु खरं सांगू का, तुला भेटल्यावर आपलं माणूस भेटल्यासारखं वाटलं. मी जे काही शोधत होतो त्यातील थोडासा भाग तरी मिळाल्यासारखे वाटले. तू भेटल्या मुळेच मला माझ्या पुढच्या प्रयोगासाठी स्फूर्ती मिळाली. मला सतत वाटत आहे की अंतराळात काहीतरी गुप्त गोष्टी आहेत. 


विशाखा - अरे पण त्यात नवल असे काय? अंतराळातील कितीतरी गुप्त गोष्टी अजून पृथ्वीवासीयांना कळलेल्या नाहीत. तिथे प्रयोग करण्यासाठी बऱ्याच मर्यादा आहेत. खरं म्हणजे मलादेखील अंतराळ प्रवास करायची खूप इच्छा आहे. परंतु तू म्हणतोस त्याप्रमाणे सध्याच्या प्रचलित साधनांनी ते अशक्य आहे. 


आशिष - मी सतत प्रयत्न करत राहणार. यश नक्की मिळेल. तू एवढी सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली आहेस, तुझे काय प्लॅनिंग आहे?


विशाखा - सोलार एनर्जी आणि कॉस्मिक एनर्जी च्या सहाय्याने ॲटम मुव्हमेंट कसे होऊ शकते याबाबत माझा प्रयोग चालू आहे.


आशिष - ग्रेट. तुझा प्रयोग यशस्वी झाल्यावर मला सांग. 


थोडावेळ गप्पा मारून झाल्यावर आशिष सर्वांचा निरोप घेतो. त्यानंतर तो डॉक्टर वामन काकांच्या घरी जातो. डॉक्टर काकांची आणि काकूंची भेट घेऊन तो घरी परततो. 


आशिष विशाखा ला भेटला हे ऐकून त्याच्या आई-वडिलांना आनंद होतो. आता गाडी रुळावरून चालू लागली आहे असे त्यांना वाटू लागते. आशिष आणि विशाखा मध्ये काहीतरी बातचीत चालू आहे, असे विशाखाच्या आई-वडिलांच्या देखील लक्षात येते. त्यांना आशिष पसंत असतो. परंतु हे दोघे जण स्वतःहून काय सांगत आहेत ते बघुया असा विचार करून विशाखाचे आई-वडील गप्प बसतात.


थोड्या दिवसांनी एक बातमी न्यूज चैनल वर सगळीकडे दिसू लागते - समुद्रात अज्ञात टोळ्यांकडून लुटालूट. गेल्या काही दिवसांपासून समुद्रातून होणाऱ्या मालवाहतूकीवर काही अज्ञात टोळ्या हल्ला करत होत्या. जहाजावरील माल लुटून त्या टोळ्या कुठे गायब  होत होत्या हे मात्र कोणाच्या लक्षात येत नव्हते. 


इकडे विशाखाचा प्रयोग यशस्वी होतो. कॉस्मिक एनर्जीच्या आणि सोलार एनर्जीच्या सहाय्याने ॲटम मुव्हमेंट करण्यात तिला यश मिळते. तिला खूप आनंद होतो. ती ही वार्ता लगेचच आशिषला कळवते. तुझी इन्स्ट्रुमेंट घेऊन येत्या रविवारी सकाळी तू माझ्या प्रयोगशाळेत ये असे अशिष तिला कळवतो. विशाखा तयार होते.


आदल्यादिवशी शनिवारी संध्याकाळी,

आशिष - आई उद्या दुपारचे जेवण स्पेशल बनव.


आई - का रे अशिष? तुझे कोणी मित्र वगैरे जेवायला येणार आहेत का?


आशिष - मित्र नाही. पण विशाखा उद्या येणार आहे.


आई - अरे वा, चांगलेच आहे की. डॉक्टर काकूंना विचारून मी विशाखाच्या आवडी-निवडी विचारून घेते. त्यानुसार उद्याचा मेनू बनवते.


आशिषची आई खूष होऊन ही बातमी आशिषच्या वडिलांना देखील सांगते. 


दुसऱ्या दिवशी सकाळीच विशाखा फोर व्हीलर घेऊन आशिष च्या घरी पोहोचते. बरोबर आणलेली इन्स्ट्रुमेंट घेऊन ती आशिषच्या घरात येते.


आशिषची आई - हे गं काय घेऊन आलीस?


विशाखा - काकू हि प्रयोगशाळेतील इन्स्ट्रुमेंट आहेत.


आशिषचे वडील - म्हणजे तू देखील आशिष प्रमाणेच प्रयोगांमध्ये गुंतलेली असतेस की काय?


विशाखा - आशिष एवढे नाही, परंतु माझे देखील थोडेफार प्रयोग चालू असतात. आईला थोडीशी घर कामात मदत देखील मी करते ना. त्यामुळे प्रयोग शाळेकडे वेळ कमी देता येतो. माझी आई सारखी बडबडत असते, सासरी गेल्यावर काम काय सासू करणार आहे का? त्यामुळे सर्व स्वयंपाक शिकून ठेव.


आशिषची आई - एवढी चांगली सून मिळाल्यावर सासू का नाही करणार काम? करेल हो तुझी सासू तुला घरकामात मदत. तू आपली तुझी प्रयोगशाळा सांभाळ.


विशाखा - सासू कशी असेल काय माहिती?


आशिषचे वडील (हसत) - तुझी सासू चांगलीच असेल बरं.


तोपर्यंत चहा पाणी होते.


आशिष - आई-बाबा तुमचे बोलून झाले आहे का? आम्हाला प्रयोगशाळेत काम आहे.


आशिषची आई - तुम्ही दोघे प्रयोगशाळेत जा. राहिलेले आपण दुपारी जेवताना बोलू.


आशिष आणि विशाखा प्रयोग शाळेत जातात.


आशिष - विशाखा तू एवढे मोठे काम केले आहेस की सांगून सोय नाही. तुझा एक्सपरिमेंट मला लवकर दाखव.


विशाखा - तु या एक्सपरिमेंट साठी का उत्सुक आहेस? हा साधाच एक्सपरिमेंट आहे.


आशिष - हा साधासुधा एक्सपरिमेंट नाही, निदान माझ्यासाठी तरी. तुला माहिती आहे ना, गॅस ॲटमची  पृथ्वीच्या वातावरणाबाहेर मुव्हमेंट न झाल्यामुळे माझा एक्सपेरिमेंट फेल गेला होता.


विशाखा - म्हणजे या एक्सपरिमेंटच्या साह्याने गॅस ॲटमचा अंतराळात प्रवास करायचा असे तर तुला म्हणायचे नाही ना?


आशिष - बरोबर ओळखलेस. 


त्यानंतर विशाखा तिचा एक्सपिरिमेंट आशिष ला दाखवते. 


तिच्या या एक्सपरिमेंट मुळे आशिष खुष होतो. आता आशिष परत प्रयोग करायचे ठरवतो. विशाखाचे इन्स्ट्रुमेंट त्याने त्याच्या मशिनरी ला कनेक्ट केले. आशिषने स्वतःला कॉम्प्रेस करून त्याचे रूपांतर सूक्ष्म अशा गॅस ऍटम मध्ये केले. आता आशिष तरंगत वर जाऊ लागला. काही मिनिटांतच तो पृथ्वीच्या वातावरण कक्षे पर्यंत पोहोचला. विशाखाच्या इन्स्ट्रुमेंटने पुरविलेल्या कॉस्मिक एनर्जीमुळे, आशिषच्या कन्व्हर्ट झालेल्या गॅस ॲटमला, मुव्हमेंटसाठी एनर्जी मिळाली होती. त्या एनर्जी मुळे आशिषने पृथ्वीच्या वातावरणाची कक्षा पार केली. आता तो अंतराळात फिरू लागला. परंतु घरी लवकर परत यायचे असल्यामुळे आशिषला माघारी फिरावे लागले. विशाखा त्याची वाट बघत बसली होती.


विशाखा - आज तरी तुझा प्रयोग यशस्वी झाला का?


आशिष (आनंदाने) - विशाखा, आज तुझ्यामुळे माझा प्रयोग यशस्वी झाला. खरे म्हणजे मला अंतराळात खूप फिरायचे आहे. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे मी परत आलो.


विशाखा - ते बरे केलेस. टप्प्याटप्प्याने पुढे जा. नाहीतर कुठेतरी अडकण्याचा देखील धोका आहे.


आशिष - आपण दोघे जण एकदा या अंतराळ प्रवासाचा अनुभव घेऊ. 


क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...