Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "इच्छाभाग४"

Read share best Marathi katha free "इच्छाभाग४"

Read best Marathi online gudh katha | Marathi love story free | मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह

इच्छा - भाग ४

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


तेवढ्यात स्टार्टर येते. दोघेजण स्टार्टर घेतात.

उषा - आपण एकमेकांना आता अहो वगैरे काय म्हणतोय? आता आपली चांगली ओळख झाली आहे. 

केयुर - बरोबर म्हणतेस.

उषा - आता कस जवळच वाटत. 

केयुर - तू बाकी एवढी मॉडर्न आहेस, पण मी बघतो कि तू नेहमी साडीच नेसलेली असते. 

उषा - का रे? मला साडी चांगली दिसत नाही का?

केयुर - उलट तू साडीत खुप छान दिसतेस. 

उषा - थँक यु. 
अरे कस आहे, काही सवयी बऱ्याच वर्षांच्या असतात. त्या पटकन बदलता येत नाहीत.

केयुर - म्हणजे तू कॉलेजला पण साडी नेसून जायचीस का?

उषा (हसत) - नाही रे. तेव्हा मी ड्रेस घालायचे. पण एरवी मी साडी नेसायचे.

केयुर - स्ट्रेंज ...

उषा - तुला आवडत असेल तर मी ड्रेस घालीन. 

केयुर - अग, तस नाही. मी कोण तुला सांगणारा?

उषा - तूच तर मला वाचवलंस. तू माझं सर्वस्व आहेस. 

केयुर विचार करत असतो, आम्हाला भेटून २ दिवसपण पूर्ण झालेले नसताना हि माझ्या प्रेमात तर पडली नाही ना?

तेवढ्यात ऑर्डर घेऊन वेटर येतो. 

दोघेजण खायला सुरुवात करतात. डिश खुप टेस्टी असते. गप्पा चांगल्याच रंगतात. साडे आठ वाजेपर्यंत दोघांचे खाणे होते. 
बील व बडीशोप वेटर घेऊन येतो व टेबलावर ठेवतो. 

उषा पटकन पर्स उघडते व बीलाचे पैसे काढून टेबलावरील पाऊच मध्ये ठेवते. बरोबर वेटरसाठी चांगली टिप देखील ठेवते. 

केयुर - अग, तू कशाला बील पेड केलेस?

उषा - तू काही बोलू नकोस. 

दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडतात. ९ चा शो सुरु व्हायला थोडाच वेळ असतो. 
केयुर गाडीला ऍडलॅबच्या पार्किंग मध्ये पार्क करतो. 

मुव्ही खरोखरच हाऊसफुल असते. मुव्ही सुरु होते. डिटेक्टिव्ह प्लस लवस्टोरी असे मिश्रित कथानक असते. सर्वांना एका जागी खिळवून ठेवणारी मुव्ही असते. उषाबरोबर मुव्ही बघायला केयुरला खुप छान वाटत असते. 

इंटरव्हलला पॉपकॉर्न व कोल्ड ड्रिंक घेऊन केयुर येतो.
पॉपकॉर्न व कोल्ड ड्रिंक घेत मुव्हीचा पुढचा भाग दोघेजण बघु लागतात. शेवटच्या क्षणापर्यंत मुव्ही उत्कंठावर्धक होत जाते. १२:३० पर्यंत मुव्ही संपते. सर्वजण बाहेर पडतात. 

केयुर व उषा गाडीत बसतात. गाडी सुरु होते. दोघांनाही मुव्ही फार आवडलेली असते. दोघेजण मुव्हीबद्दल बोलत असतात. बाकीच्या आवडलेल्या मुव्हीजचा विषय निघतो. उषाला ७० च्या दशकातील मुव्हीज फार आवडत असतात.

केयुर - मला देखील जुने मुव्हीज आवडतात. पण, मी नवीन मूव्हीच जास्त बघतो. 

उषा - मला नवीन मुव्हीज आवडतात. पण ७० च्या दशकातील मूव्हीजची खासियत अजून वेगळीच होती. त्यामुळे मला त्यातील अॅक्टर, अॅक्टरेस, व्हिलन, म्युझिशिअन या सर्वांची डिटेल माहिती आहे.

थोडे पुढे आल्यावर केयुरला परागने सांगितलेली गोष्ट आठवते. 

केयुर - उषा, तुला एक गोष्ट सांगु? घाबरणार तर नाही ना तू?

उषा (विस्मयाने) - काय सांगणार आहेस?

केयुर - भुताची गोष्ट. 

उषा - नाही, मी नाही घाबरत भुताच्या गोष्टी ऐकायला. तू सांग. मला आवडते ऐकायला. 

केयुर - आमच्या कंपनीत पराग नावाचा एक तरुण मुलगा आहे. त्याला स्वतःला अनुभव आला होता याच रस्त्यावर आणि तेही रात्रीच्या वेळेस. साधारण याच टायमाला. 

उषा - ए, मला घाबरवतोस काय?

केयुर - नाही ग. ऐक पुढे.
घडलेली सर्व गोष्ट केयुर तिला सांगतो. 

उषा - ए, तुझा विश्वास आहे का रे भुतावर?

केयुर (हसत) - काहीपण काय विचारतेस? मी भुतावर कसा विश्वास ठेऊ? ते काय माझे मित्र आहे विश्वास ठेवून त्याला काही सांगायला?

उषा - फालतू जोक नको मारुस. मला म्हणायचे आहे कि भुते असतात हे तुला खरे वाटते का?

केयुर - अगदी कालपर्यंत मला हे खरे वाटत नव्हते. कारण मी किंवा माझ्या कोणत्या जवळच्या व्यक्तींनी भुताला पहिले नव्हते. फक्त ऐकलेल्या गोष्टीच पुढे फॉरवर्ड होत असत. पण काल परागने जी गोष्ट सांगितली त्यामुळे मला विचार करायला भाग पाडले. कारण पराग असे खोटे काही सांगणार नाही.
तुला काय वाटते? तू भूत बघितलं आहेस कधी? 

उषा - मी बघितले नाही. पण भूत असते. माझी आई पण सांगायची कि मृत्यूनंतर जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा जर तो माणूस खूप वाईट  वागला असेल, तर तो माणूस भूत योनीत जातो.
तुला भीती वाटते का?

केयुर - भीती नाही वाटत, पण ऐकायला खुप भयानक वाटते. 

उषा (हसत) - तुला भूत काही नाही करणार. कारण माझा देवगण आहे. मी तुझ्या बरोबर आहे ना. 

केयुर - काय माहिती, हे देवगण, राक्षसगण व मनुष्यगण यांचा भूतांशी काही संबंध असतो का ते?

उषा - अरे मला पण माहित नाही. मी गंमत केली.

बोलता बोलता गाडी नागलोलीत पोहोचते.
केयूर उषाला तिच्या घरी सोडतो आणि नंतर त्याच्या बंगल्यावर येतो. घरी आल्यावर लगेचच त्याला झोप लागते.

मंगळवारची सकाळ होते. रोजचा दिनक्रम चालू होतो. आज संध्याकाळी केयुर व उषाची भेट होत नाही पण मोबाईलवर चॅटिंग होते. केयुरच्या मनाला हुरहूर लागते. 

बुधवारी मात्र संध्याकाळी केयुरच्या घरी उषा येते. आज तीने ब्लॅक जीन्स पॅन्ट व व्हाईट टॉप घातलेला असतो. 
बाहेर अमोल व शोभना काम उरकून घरी जायला निघालेले असतात. 

शोभना - कोण पाहिजे आपल्याला?

उषा - केयुर आहे ना आत? मला त्याला भेटायचे आहे.

शोभना - होय, साहेब आतच आहेत.

उषा बंगल्याची डोअरबेल वाजवते. केयुर दार उघडतो.

अमोल  व शोभना दोघेजण केयुरला जातो म्हणून सांगून बंगल्याच्या बाहेर पडतात.

अमोल - या मॅडम कोण ग? गावात नवीनच दिसत आहेत. 

शोभना - काय माहिती. अनन्या मॅडम बरोबर कंपनीत कामाला आल्या असतील. 
दोघेजण घरी निघून जातात.

इकडे उषा बंगल्यात येते. तिला जीन्स व टॉप मध्ये बघून केयुर तिच्याकडे बघतच बसतो.

उषा - काय पाहतोस? मला आत ये वगैरे सांगशील कि नाही?

केयुर - सॉरी हं. ये ना आत ये. बस.

उषा - ते दोघेजण कोण होते?

केयुर - ते येथे कामाला आहेत. अमोल व शोभना.
अग, पण हे मी काय बघतो आहे?

उषा - का?

केयुर - आज एकदम जीन्स आणि टॉप. 

उषा - छान नाही का दिसत. 

केयुर - आज तू इतकी सुंदर दिसत आहेस कि काय सांगू?

उषा - मुद्दामच आज चेंज केला. मी उगाचच काकुबाई वाटायला नको.

केयुर - काल नाही भेटलीस? 

उषा - मी जरा बिझी होते. पण तू का नाही आलास?

केयुर - असं न बोलवता मी कसा येणार, काही कारणाशिवाय?

उषा - मी नाही का येते तुझ्याकडे?
ते जाऊ दे, आजचा तुझा प्लॅन काय आहे? 

केयुर - काही नाही. आता जरा न्युज ऐकत बसणार होतो. 

उषा - किती अरसिक आहेस रे? एक सुंदर मुलगी बरोबर असताना तुला न्युज बघाव्याश्या वाटतात?

केयुर - मला काही सुचत नाही गं. तूच सांग काय करायचे ते. मला येथील जास्त कुठची माहिती नाही.

उषा - मी एवढी गाईड असताना तुला कसली चिंता? 
चल आज मोर्ली हिल वर जाऊ. वरपर्यंत गाडी जाते. तेथेच एका हॉटेलमध्ये डिनर घेऊ.

केयुर - किती वेळ लागतो तेथे पोहोचायला?

उषा - फार नाही आपल्या इथून १ तासावर आहे. 

केयुर तयार होऊन जोशी काकांना फोन करतो कि आज पण मी बाहेर डिनरला जातो आहे. 
अधूनमधून हे बाहेर डिनरला का जात आहेत, असा प्रश्न जोशी काकांना पडतो. पण ते काही विचारत नाहीत.

केयुर आणि उषा दोघेजण गाडीतून निघतात. मोर्ली हिल हा तेथील पर्यटनाचा उत्तम स्पॉट असतो. हिलवरून दूरवर पसरलेला समुद्र खूप मस्त दिसायचा. 

Hill station road




केयुरच्या मनात विचारांचे वादळ उठलेले असते. ४ दिवसांची आमची ओळख, आणि उषा मला एवढी का आवडायला लागली? माझे तिच्यावर प्रेम तर नाही ना बसले? कि मला उगाचच असे वाटते आहे? 

या विचारांच्या वादळात केयुरचे लक्ष विचलित होते. गाडी एव्हाना हिलची चढण चढत निम्यावर आलेली असते. केयुरचा गाडीवरून ताबा सुटतो. एका वाकणावर गाडी बाजूच्या कठड्याला धडकते. आपली मोठी चूक झाली हे लक्षात येऊन, केयुर डोळे गच्चं मिटून घेतो. 
तेवढ्यात त्याला जाणवते, कि उषाने आपल्या हातावर हात ठेऊन स्टिअरिंग फिरवले आहे. गाडी दरीत पडता पडता वाचते. उषा तिच्या सीटवरून उठून गाडीचा ताबा घेते. पण ड्रायव्हिंग सीटवर केयुर बसला असल्यामुळे तिला थोडे कठीण जाते. उषा गाडी बाजूला उभी करते. 

हिल वर जाण्यासाठी केलेला रस्ता बऱयापैकी रुंद असतो. त्यामुळे यांच्या गाडीच्या बाजूने तुरळक वाहतूक चालू असते. 

उषा (रागावून) - कोणत्या विचारात होतास? ड्रायव्हिंग करताना मन शांत नको का ठेवायला?

केयुर - मी तुझाच विचार करत होतो.

उषा - माझा? तो कशासाठी?

केयुर - मी तुला आत्ता सांगणार नव्हतो. आपली फक्त ४ दिवसांची ओळख आहे. त्यामुळे इतक्यात असं काही तुला सांगणे योग्य नाही. जाऊदे. आता आपण पुढे जाऊ. 

उषा - ४ दिवसांची ओळख असली म्हणून काय झाले. आपण चांगले मित्र आहोत. कदाचित आपली जन्मोजन्मीची ओळख असेल. म्हणून आपली लवकर ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली.

केयुर - हे असं असतं. मागचा जन्म वगैरे यावर माझा विश्वास माही.

उषा - मलादेखील कुठे माहित आहे, कि आधीच्या जन्मी मी कोण होते? पण नाती अशी उगाचच तयार होत नाहीत. त्यांचा भूतकाळाशी संबंध असतो. 
आता मला खरं खरं काय ते सांग.

केयुर - माझे तुझ्यावर प्रेम बसले आहे. पण ४ दिवसांच्या ओळखीत मी तुला हे कसे सांगू? 

उषा - तू जेव्हा तुझ्या जीवाची पर्वा न करता मला बुडताना वाचवलेस ना, तेव्हाच माझे तुझ्यावर प्रेम बसले. 
कधी कधी बघ एखाद्या नवख्या व्यक्ती बद्दल आपल्याला आपुलकी वाटते. त्या व्यक्तीचा गतजन्मात आपल्याशी काहीतरी चांगला संबंध आलेला असतो. दरवेळी काही नवरा बायकोचेच प्रेम असते असे नाही. ते गतजन्मात, मामा - भाच्याचे, काका - पुतण्याचे किंवा आजी - नातीचे असे वेगवेगळे असते. त्यामुळे या जन्मी ती व्यक्ती आपल्या नात्यातील नसली तरी आपल्याला त्या व्यक्तीविषयी विशेष आस्था वाटते.

केयुर - मला तर वाटले, कि आता सर्व संपले. पण तु इतक्या शिताफिने स्टेअरिंग फिरवलेस आणि गाडिचा ताबा घेतलास, त्यामुळे आपण वाचलो. आता पुढचे ड्रायव्हिंग तूच कर. मला आता त्या आठवणीने कापरे भरले आहे. आता मला कॉन्फिडन्स राहिलेला नाही.

उषा - ठीक आहे. पण लक्षात ठेव पुन्हा अशी चूक करू नकोस. देवाने आपल्याला येथे जन्माला घातले आहे ते अशा चुका करून मरण्यासाठी नाही. 

आता उषा ड्रायव्हिंग करू लागते आणि केयुर बाजूला बसतो. निम्मेच अंतर बाकी असते. थोड्याच वेळात दोघेजण हिलवर पोहोचतात. हिलच्या टॉपचा परिसर पण खुप विस्तीर्ण असतो. बरेच पर्यटक लॉजवर येऊन राहिलेले असतात. हिलच्या कडेच्या सर्व पॉइंटवर लोखंडी कठडे बसवलेले असतात. 

केयुर आणि उषा एका पॉइंटवर जाऊन बाकावर बसतात. केयूरच्या मनात दोघांचा सेल्फी काढावा असे येते.

क्रमशः


कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...